PostImage

pramod abhiman raut

Oct. 3, 2023   

PostImage

Anandacha Shidha : दिवाळीत मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यात आता आणखी दोन …


 

चिमूर प्रतिनिधी :-

        राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांना देण्याचा निर्णय झाला. यावेळच्या आनंदाचा शिधा देताना त्यामध्ये मैदा, पोह्याचा देखील समावेश केला जाणार आहे. दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

         पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 वस्तू होत्या. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 530 कोटी 19 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖